समिधा
प्रत्येक वेळी मीच बरोबर कशी असेन ?
स्वत:चं समर्थन करताना नेहमी दुसरी व्यक्ती चुकली असं कसं होऊ शकेल ?
माझ्या पराभवात दुसऱ्याची चूक कशी काय ?
कशासाठी मी स्वत:ला गोंजारत बसते?
सरळ सरळ पराभव स्वीकारत का नाही ?
माणूस आहे मी....
चुकणारच....
पुन्हा उभी राहीन
त्यात नवीन काय !
तेच तर करत आलेय!
झेप घेताना एक पाऊल मागेच जायचं असतं !
ही पुस्तकातील वाक्य पुस्तकातच ठेवायची असतील तर माझ्या शब्दांवर लोकांनी प्रतिसाद द्यावा ही अपेक्षा मी का ठेवावी !
थोडं मागे जायला हवं !
स्वत:ला पारखून पहायला हवं !
समिधा अर्पण करायची तर ती उन्हात वाळली पाहिजे.
ओली राहिली तर हा यज्ञ अर्धवट राहील !
मृत्युच्या अखेरच्या घटके पर्यत मोक्ष मिळणार नाही. नंतरचं पाहायला मी असणारच नाही.
झेप घ्यायची पण त्यात भरकटायला नको याची काळजी ही घ्यायला हवी !
पुढच्या १० पावलां आधी १ पाऊल मागे जायला हवं !
मागचं पाऊल उचलायला हवं !