सिमॉन
लोक मला इग्नोर करतात, वेडी, मूर्ख म्हणतात, मी सुंदर नाही आणि मला मुल
नसल्यामुळे मला अडाणी समजतात. म्हणून मी स्वत:शीच काही गोष्टी ठरवल्या आहेत. मला
मुल हवंय आणि तेही मोशी कडून. त्याच्या सारखं समजदार, निरोगी, तल्लख बुद्धिवान,
कार्य तत्पर आणि मेहनती बाळ मला हवंय. त्यासाठी मी मोशी ला काही बोलणार नाहीये. तो
स्वत:च या गोष्टीचा विचार करेल किंवा त्याच्या कडून मला मुल होण्यासाठी पूरक कृती घडेल.
मी त्याच्यावर कसलाही भार टाकणार नाही, ना बाळाच्या जन्माआधी ना बाळाच्या
जन्मानंतर. सगळ्याची जबाबदारी केवळ आणि केवळ माझी असेल. मला मोशी पासून गर्भधारणा
येत्या ३-४ महिन्यातच व्हावी हि अपेक्षा आहे. ह्या गर्भधारणे साठी मी आवश्यक ते प्रयत्न
करीत आहे. त्यासाठी औषधे, व्यायाम आणि आराम ह्या सर्व गोष्टी यथास्थित करण्याचा मी
प्रयत्न करीत आहे. सृष्टी माझ्या या प्रयत्नात मला सहकार्य करील अशी माझी आशा आहे.
मला शक्यतो समजदार, निरोगी, तल्लख बुद्धिमत्तेची, कार्यतत्पर आणि मेहनती मुलगीच
व्हावी अशी माझी अपेक्षा आहे. मी तिचे ‘सिमॉन’ प्रमाणे एखादे विदेशी नाव ठेवण्याचा
विचार करीत आहे. ‘सिमॉन’ हे नाव मोशीच्या नावाशी हि साधर्म्य साधणारं आहे. माझे
स्वप्न आहे कि सिमॉन आपल्या समाजाच्या सार्वत्रिक उन्नयनासाठी प्रयत्न करील आणि
त्यासाठी ती सायकल वरून संपूर्ण देश पालथा
घालील. त्यानंतरती आपल्या लढ्याची किंवा एकंदरीतच चळवळीची दिशा ठरवील. या कामात
तिला तिच्या बबलू अर्थात तेजवील मामा आणि बटी अर्थात अस्मिता मावशीची पण साथ
मिळेल. आजोबा ज. वि. पवार आणि आजी जयमाला पवार या दोघांचे पूरक गुण ‘सिमॉन’ मध्ये
उतरतील. माझ्या सर्व कुटुंबियांना ‘सिमॉन’चे खूप कौतुक वाटेल. जी उपेक्षा आणि
अवहेलना माझ्या वाट्याला आली तिचा अंशही तिला कधी भोगायला लागू नये. अपयश हे
तिच्यासाठी गुरु म्हणूनच काम करील. स्वत:च्या हिमतीवर ती तिचे समृद्ध भारताचे
स्वप्न साकार करेल. मोशीपासून मला झालेली माझी मुलगी ‘सिमॉन’ हिची ख्याती दूर
देशात सुद्धा नांदेल. ‘सिमॉन’ धामणकर हे नाव सर्व जगात दुमदुमेल.
सिमॉनचं खरं नाव तिला लाभलं असतं तर तिचं नाव ‘सिमॉन नायर’ असं असलं असतं. पण
मला किंवा माझ्या मुलीला इतर कोणाच्या हि आयुष्यात वादळ निर्माण करायचे नाही
त्यामुळे ती ‘सिमॉन धामणकर’ म्हणूनच प्रसिध्द होईल आणि आपले कार्य तळागाळातील
अखेरच्या माणसापर्यंत पोहोचवून त्याला शिक्षित, सुशिक्षित करून, मानसिक, सामाजिक
आणि आर्थिक दृष्ट्या सबळ बनवेल. आरक्षणाच्या कुबड्या निघून जाताना दिसतील आणि डॉ. बाबासाहेब
आंबेडकर यांच्या स्वप्नातील अखंड, जातविरहित, विकसित समृद्ध आणि ऐश्वर्य संपन्न भारत
साकारण्यात यशस्वी होईल.
हे सृष्टी, माझे हे स्वप्न साकारण्यास मला बळ दे, मला मोशीचे बाळ दे.
No comments:
Post a Comment