इतकंच....
तुझ्या झोळीत काय ??
माझ्या झोळीत नैराश्य
!
तुझ्या
झोळीत काय ??
माझ्या झोळीत वैराग्य !!
तुझ्या
झोळीत काय ??
माझ्या झोळीत यातना !!
तुझ्या
झोळीत काय ??
माझ्या झोळीत तिरस्कार !!
तुझ्या
झोळीत काय ??
माझ्या झोळीत अपमान !!
तुझ्या
झोळीत काय ??
माझ्या झोळीत हतबलता !!
बस्स..... बस्स .....
तू साऱ्यांना विचारतोस
आता तू सांग, तुझ्या झोळीत काय ??
‘माझ्या
झोळीत ? माझ्या झोळीत
लाकडं,
केरोसिनची बाटली आणि काडेपेटी’
.....
आँ कशासाठी ? ! ? ! ? !
‘तुमच्या
झोळ्या पेटवण्यासाठी’
.....
खरंच तू जाळू शकशील यांना ? !!
‘हो
पण तुम्ही तुमच्या झोळ्या अशा हृदयाला कवटाळू नका ....
तुमच्या
निर्धाराशिवाय त्या यमसदनी पोहोचू शकणार नाही
नुसती
बोलाची कढी तुमच्या चेतना चेतना चेतवू शकणार नाही
मला
तुमची साथ द्या ...... नवे रस्ते खोदणारे हात द्या’
ही
पहा मी पेटवली होळी
टाका
तिच्यात आपली धिंडवड्यांची झोळी
हो....
पण जरा जपून
नाहीतर
हे झोळीबंद विंचू माझ्यावरच फुत्कारतील
ही
लालचावलेली गिधाडे माझेच लचके तोडतील
आणि
तुम्ही जाल पळून
‘ज्याने
मृगजळातून काढलं त्यालाच
पाणीऽऽ
पाणीऽऽ करायला लावलं’
हा
इतिहास आहे.
त्याची
पुनरावृत्ती व्हायला नको
इतकं
आणि इतकंच .....
No comments:
Post a Comment